Pages

Tuesday, March 15, 2011

केवळ त्याच्यासाठी...

(निपुण दीक्षित यांनी CWC 2011 मधल्या भारत-द. आफ्रिका सामन्यानंतर लिहिलेल्या एका नितांतसुंदर लेखाचा मी केलेला भावानुवाद)

तुम्ही परीक्षेत नापास झाला होतात ती घटना आठवा. किती जणांना आठवतंय ते? - तुमचा वर्ग, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक. एवढेच? तुमचा आयआयटी किंवा आयआयएम मधला प्रवेश हुकला होता. कोणाच्या लक्षात आहे हे? तुम्ही तुमच्या वर्गात, शाळेत, विद्यापीठात, राज्यात पहिले आल्यावर होणारा आनंद तुम्ही किती वेळा अनुभवला आहे? तुमचा व्हिसा स्टॅम्प झाला नाही, किंवा तुमचं प्रमोशन हुकलं, तुमच्या वडिलांनी तुमच्या विशीमध्ये तुमचा "तू कसल्याही कामाचा नाहीस" असं म्हणून उद्धार केला होता, आता बॉसही तेच करतोय.. कसं वाटतंय तुम्हाला?

तुम्ही आत्मपरीक्षण करत राहता आणि ज्यांना तुमच्या आयुष्यात काडीइतकीही किंमत नाही अशांनी तुमच्यावर टीका केली, तुमची चहाडी केली, तुमची थट्टा केली की कोशात जाऊन बसता. दु:खी होता, उद्ध्वस्त होता आणि अगदी आपल्या, जवळच्यांनी टर उडवली की रडता. असंही म्हणत राहता की आज मी खचलोय! अशा परिस्थितीतून बाहेर पडून पुन्हा पहिल्यासारखं व्हायला आणि पुढे निघायला आपल्याला खूप म्हणजे खूपच धैर्य जमवावं लागतं.. खरंय ना?

आता ही परिस्थितीही बघा - एक माणूस थर्डमॅन सीमारेषेवर उभा आहे. वर्ल्डकप सामन्यातली ती शेवटची ओव्हर आहे. सामन जिंकायला गोलंदाजाने केवळ समंजसपणे गोलंदाजी करण्याची गरज आहे! पण सीमारेषेवरचा तो माणूस काय पाहतो, तर त्या गोलंदाजाचे चार अत्यंत खराब, दिशा, टप्पा, प्लॅनिंग आणि अखेरीस पश्चात्ताप यापैकी सर्वांचा अभाव असलेले चेंडू!. त्या माणसाने जवळजवळ सर्वकाही अगदी अचूक केलेले असताना पुन्हा एकदा तशाच परिस्थितीत भारत सामना हरतो.

तो रडत नाही. कुठलीच भावना चेहर्‍यावर दाखवत नाही. फक्त मान खाली घालतो आणि मैदान सोडतो. त्याने आतापर्यंतच्या २२ वर्षात हे अपयश अनेक वेळा पाहिलंय. आणि केवळ त्याचा बालपणीचा वर्ग, नातेवाईक, मित्रमैत्रिणीच नव्हे तर अख्ख्या जगाने ते अनेक वेळा पाहिलंय. अशा वेळी त्याच्या मनात आणि हृदयात काय चाललं असेल याची साधी कल्पना करू शकण्याइतकेही आपण प्रगल्भ नाही. आणि म्हणूनच मला सचिन कधीच व्हायचं नाही!

खरोखर, त्याने एकट्याच्या जोरावर सबंध देशाची कळी अगणित वेळा खुलवली आहे. आपल्याला 'मध्यमवर्गीय' या मानसिकतेतून उभारी घेण्यासाठी तो प्रेरणा ठरला आहे. त्याचं समर्पण आणि मानसिक ताकद यांना तोड नाही. हे खासकरुन ज्यांनी काल रात्री भारत हरल्यानंतर पुन्हा त्याची टर उडवली होती, त्यांच्यासाठी आहे. ते स्वतःच एक मध्यमवर्गीय मानसिकता आहेत. ते फक्त दर्जाहीन थट्टा करण्यासाठी इतरांची निंदा करतात. त्यांनी आपली संपूर्ण हयात डबक्यात घालवली आहे आणि समुद्र पाहिल्याची स्वतःची समजूत करून घेतली आहे.

जरा त्या माणसाचाच विचार करा. त्याचं वय आता ३७ आहे. तो गेली २२ वर्षं जवळजवळ अखंडपणे खेळतोय. ज्या पद्धतीने काल रात्री तो धावत होता आणि मैदानावर झेपावत होता ते पाहून एखादा २२ वर्षाचा तरूणही खजील झाला असेल. जगातील सर्वोत्कृष्ठ वेगवान गोलंदाजीविरूद्ध ज्या वेगाने त्याने भारताला सुरूवात करून दिली तो श्वास रोखून धरायला लावणारा होता. आणि अजूनही तो स्वतःमध्ये सुधारणा करत असतो, जे अमानवीय प्रकारात मोडणारे आहे. लोक उगाच त्याला देव समजत नाहीत!

पण तरीही मला सचिन व्हावसं वाटत नाही. आपण आपलं चाकोरीबद्ध आयुष्य, तेही फार थोड्या लोकांवर प्रभाव टाकू शकेल असं, सुरळीत ठेवण्यासाठी आटापिटा करत असतो. कल्पना करा, त्या आंतरिक संघर्षाची, मानसिक आणि शारिरीक वेदनांची, काळासोबत गोठून गेलेल्या अश्रूंची, गुढघे, कोपरे आणि रोज रात्री ज्यांना एकतर बँडेज बांधावं लागतं किंवा खूप काळजी घ्यावी लागते अशा शरीरातील प्रत्येक सांध्यांची, मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्याआधी आजही मिटत नाहीत अशा डोळ्यांची, याआधी ९९ शतके काढलेल्या आणि तरीही लाखो जनतेच्या अपेक्षांकडे पाहणार्‍या त्याच्या बॅटची क्षमता किती असेल?

आणि तो त्या अपेक्षांना फक्त वास्तवात बदलतो. आपण अचंबित होऊन पाहतो, स्वतःला धन्य समजतो..

असो. मला असं वाटतं की त्याच्या टीमने आता 'झालं ते पुरे झालं' हे समजण्याची आता वेळ आली आहे. त्यांच्यावर आता केवळ देशच नव्हे तर सचिनचेही उपकार आहेत. त्यांनी सचिनसाठी जिंकायची आता गरज आहे. भारताने वर्ल्डकप जिंकावा म्हणून तो त्याच्याकडून काहीही कमी पडू न देता त्याचं सर्वस्व देतच राहिल याची खात्री बाळगा.

क्रिकेट हा त्याच्यासाठी केवळ खेळ नाही आणि तो केवळ एक खेळाडूही नाही. तो त्याच्याही पलिकडे पोहोचलाय... शब्दात मांडणं अवघड आहे ते...

- निपुण दीक्षित
(अनुवादः नचिकेत जोशी)


HERE IS THE ORIGINAL ARTICLE :

Remember when you failed an examination. How many people recall that, your class, friends, relatives? You failed to make it to the IITs or IIMs. Who remembers. How many times have you had the feeling of being the best in your class, school , university, state….., you failed to get a visa stamped this quarter…, you missed a promotion this year…, how did it feel when you dad told you in your early twenties that you are good for nothing…..and now your boss tell you the same...

You keep introspecting and go into a shell when people most of whom don’t matter a dime in your life criticize you, back bite you, make fun of you. You are left sad and shattered and you cry when your own kin scoffs at you. You say I am feeling low today. It takes a lot from us to come out of these everyday situations and move on. A lot??? really?

Now here’s a man standing on the third man boundary in the last over of a world cup match. The bowler just has to bowl sensibly to win this game. What the man at the boundary sees is 4 rank bad bowls bowled without any sense of focus, planning or regret. India loses, yet again in those circumstances when he has done just about everything right.

He does not cry. Does not show any emotion. Just keeps his head down and leaves the field. He has seen these failures for 22 years now. And not just his class, relatives, friends but the whole world has seen these failures. We are too immature to even imagine what goes on in that mind and heart of his. That’s why I would never want to be Sachin.

True, he has single handedly lifted to moods of this entire nation umpteen number of times. He has been an inspiration to rise above our mediocrity. Nobody who has ever lifted the willow even comes close to this man’s genius. His dedication and metal strength is unparallel. This is specially for those people who would have made fun of him again last night when India lost. They are people who are mediocre in their own lives. Who just scoff at others to create cheap fun. Who have lived in a small hole throughout their lives and thought they have seen the oceans.

Think about the man himself. He is 37 years of age. He has been playing almost non stop for 22 years. The way he was running and diving around the field last night would have put 22 year olds to shame. The way he played the best opening quickies in the world was breathtaking. He just keeps getting better which is by the way humanly impossible. Its not for nothing that people call him GOD.

But still I don’t want to be in those shoes. We struggle in keeping our monotonous lives straight, lives which affect a limited number of people. Imagine what would be the magnitude of the inner struggle for him, pain both mental and physical, tears that have frozen with time, knees and ankles and every other joint in the body that is either bandaged or needs to be attended to every night, eyes that don’t sleep before a big game, bats that have scored 99 international tons and still see expectations from a billion people.

And he just converts those expectations into reality. We watch in awe, feel privileged.

Well I think its time that his team realizes that enough is enough. They have an obligation, not towards their country alone but towards sachin. They need to win this one for him. Stay assured that he himself will still deliver and leave no stone unturned to make sure India wins this cup.

This is not just a game, and he is not just a sportsman. Its much more than this. Words fail here.....

--- निपुण दीक्षित

3 comments:

Unknown said...

its amazing! i cant catch my lines for this article. Really great artical sir, you translated very nicely.

नचिकेत जोशी said...

Thanks Priyanka!! :)
but which Priyanka you are? :P

SRUJAL said...

भाषांतर करताना मूळशब्दाला फक्त प्रतिशब्द लिहिण्यापेक्षा वेगळी प्रतिभा लागते.तुमचे हे भाषांतर मूळ लेखाइतकेच कसदार झालेले आहे, आणि हि गोष्ट तुमच्या कौशल्याकडे निर्देश करते. अप्रतिम