Pages

Saturday, October 29, 2011

पुस्तक परिचयः "वॉल्ट डिस्ने - द अल्टिमेट फँटसी"

राजहंस प्रकाशनने आणलेलं यशवंत रांजणेकर लिखित "वॉल्ट डिस्ने - द अल्टिमेट फँटसी" हे पुस्तक म्हणजे एका असामान्य कर्तृत्त्वाची चरितगाथा आहे.
मिकी माऊस, डॉनाल्ड डक या जगप्रसिद्ध कार्टून पात्रांचा निर्माता आणि अभूतपूर्व अशा डिस्नेलँडचा जनक वॉल्टर इल्यास डिस्ने (संपूर्ण पुस्तकात डिझ्नी ऐवजी डिस्ने हाच शब्द वापरला गेला आहे) या सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या, शिक्षण अर्धवट सोडलेल्या एका अवलिया मुलाने पुढील आयुष्यात जी झेप घेतली त्याचं सार्थ वर्णन हे पुस्तक करतं.
आज National Geographic वर दाखवले जाणारे documentaries, बाल हनुमान वगैरे full length कार्टून मूव्हीज, किंवा The Jungle book सारख्या animated serials (in fact the jungle book ची निर्मीती डिस्नेचीच आहे) या सर्व कल्पनांचा मूळपुरूष म्हणजेच वॉल्ट डिस्ने! वॉल्टची कारकिर्द, त्याचा थक्क करणारा प्रवास याचं सविस्तर, वाचकाला खिळवून ठेवणारं वर्णन लेखकाने केलं आहे. अक्षरश: शून्यातून विश्व उभं केलेल्या वॉल्टचा प्रत्येक स्वभावविशेष त्यांनी छान रेखाटला आहे.
मी या पुस्तकावर ज्ज्जाम फिदा झालोय. बरेच वर्षांनी असं motivational, inspirational पुस्तक वाचायला मिळालं.. I loved it... बहुतेकदा आपण सर्वच प्राप्त परिस्थितीला शरण जाऊन ''destined'' मार्ग स्वीकारतो. इथे एक असा माणूस आपल्याला भेटतो, की जो सुरूवातीच्या काळात जवळजवळ व्यावहारिकदृष्ट्या फसवला गेला. आणि त्याचा हा learning period तब्बल १० हून अधिक वर्षांचा आहे!! बहुतांश काळ त्याने जेवढं कमावलं ते नवीन करण्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करताना गमावलं. पण काळाच्या पुढे पाहण्याची वृत्ती आणि ती कालतीत स्वप्नं खरी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी यामुळे त्याने एक प्रकारे क्रांतीच घडवली. या सगळ्याचं रोमांचकारी वर्णन इथे वाचायला मिळतं..
जरूर वाचा!!
तांत्रिक तपशीलः
नावः "वॉल्ट डिस्ने - द अल्टिमेट फँटसी"
लेखकः यशवंत रांजणेकर
प्रकाशनः राजहंस प्रकाशन
प्रथमावृत्ती: मे २००८
पृष्ठे: ३३२, किंमतः २५० रू
- नचिकेत जोशी(१२/५/२०११)

No comments: