Pages

Tuesday, July 12, 2011

तुझी खबर

खोल खोल आतवर तुझी नजर
पोचते तिथे जिथे तुझेच घर

आसवांत वाहिल्या तुझ्या खुणा
साचले रूमालभर तुझे शहर!

विरह वाढता रडायचीस तू
(मी असायचो उगाच थेंबभर)

आठवांत राहती जुन्या व्यथा
सांग मग पडेल का तुझा विसर?

चालतो तसेच पाय ओढुनी
वाट हरवली कधीच दूरवर

जीवना तुझा लळाच लागला
मरणही तुझीच वाटते कुसर

तू निवांत वाच एकदा कधी
मी तुझेच पत्र अन् तुझी खबर

- नचिकेत जोशी (१२/७/२०११)

2 comments:

अर्चना said...

तू निवांत वाच एकदा कधी
मी तुझेच पत्र अन् तुझी खबर...
छान आहे कविता...+++

नचिकेत जोशी said...

Thanks Archana! :)