(बांधण जनप्रतिष्ठान आयोजित काल (४ मार्च) पुण्यात झालेल्या "गजलोत्सव २०१२" अंतर्गत मुशायर्यामध्ये सादर केलेली गझल - )
जुने नाते अजुनही रेशमी आहे
तरीही बघ तुला परकाच मी आहे!
जुने नाते अजुनही रेशमी आहे
अजुनही त्यात थोडासाच मी आहे!
तुझ्या पत्रातला मजकूर विश्वासू!
तुझे प्रत्येक अक्षर मोसमी आहे
अता "आम्ही" म्हणवतो मी स्वतःलाही
(तुझ्याबद्दल दिलेली ती हमी आहे!)
म्हणे तू प्रेमही केलेस माझ्यावर!
तुझ्या-माझ्यातली ही बातमी आहे
भटकतो पावसाचे थेंब शोधत मी
रुजायाची मुळी क्षमता कमी आहे!
कधी हलकेच भळभळतो स्वतःशी मी
तसा वरवर पुरेसा संयमी आहे
तसे नाही कुणी जे नाव मी घ्यावे!
तरी 'ती' सोबतीला नेहमी आहे
- नचिकेत जोशी (२७/१/२०१२)
2 comments:
वाह...क्या बात है !!!
-अर्चना
very nice.......
Post a Comment