बिचकते आयुष्य माझे आयते यश पाहिल्यावर
एरवी संतुष्ट असते कमवलेल्या अपयशावर
मी जरी नसलो तरी गर्दी स्वतःतच दंग असते
मी असा वागेन का हे चेहरेही पांगल्यावर?
ती समजते - 'संकटांशी एकटी लढते सदा मी!'
(कोण हो जाणार मदतीला तिने झिडकारल्यावर?)
ओठभर चव घेउनी, उष्टावले त्याने तुला! अन् -
अजुनही वाटे तुला की प्रेम करतो तो तुझ्यावर!
वाट असते स्तब्ध तेव्हा शांतता करतेच दंगा
रान रेंगाळून जाते चालणार्या पावलांवर
ओळखीची खूण नसते वागण्यामध्ये कधीही
भाव परका ओळखीचा झळकतो पण चेहर्यावर!
जवळ कायमचे नको आहे तुला कोणी मुळीही
पाहिजे खांदा तुला तू दोन अश्रू ढाळल्यावर!
नेहमी दु:खात होते एक राजा, एक राणी
एकदा झाले सुखी ते! पण कहाणी संपल्यावर!
नचिकेत जोशी (१०/४/२०१२)
एरवी संतुष्ट असते कमवलेल्या अपयशावर
मी जरी नसलो तरी गर्दी स्वतःतच दंग असते
मी असा वागेन का हे चेहरेही पांगल्यावर?
ती समजते - 'संकटांशी एकटी लढते सदा मी!'
(कोण हो जाणार मदतीला तिने झिडकारल्यावर?)
ओठभर चव घेउनी, उष्टावले त्याने तुला! अन् -
अजुनही वाटे तुला की प्रेम करतो तो तुझ्यावर!
वाट असते स्तब्ध तेव्हा शांतता करतेच दंगा
रान रेंगाळून जाते चालणार्या पावलांवर
ओळखीची खूण नसते वागण्यामध्ये कधीही
भाव परका ओळखीचा झळकतो पण चेहर्यावर!
जवळ कायमचे नको आहे तुला कोणी मुळीही
पाहिजे खांदा तुला तू दोन अश्रू ढाळल्यावर!
नेहमी दु:खात होते एक राजा, एक राणी
एकदा झाले सुखी ते! पण कहाणी संपल्यावर!
नचिकेत जोशी (१०/४/२०१२)
2 comments:
अप्रतिम !! मित्रा........अप्रतिम !!
तुझ्या प्रतिभेला, उभे राहून........ सलाम !
राजन महाजन
Thank you Rajan! :)
Post a Comment