Pages

Tuesday, November 1, 2011

मागणे

(दीपज्योती दिवाळी अंक २०११ मध्ये पूर्वप्रकाशित -
http://deepjyoti2011.blogspot.com/2011/10/blog-post_581.html)


अजून श्वास मागतो, अजून श्वास मागतो
जिथे सदा वसेन मी, असा निवास मागतो

पहाड येऊ देत वा असो उधाण सागरी
हजार सूर्य पेटले, असा उजेड अंतरी
कधीतरी दिसेल गाव, तो प्रवास मागतो

फकीर जाहलो तरी, सुखास ना पडो कमी
मनी भरून राहू दे प्रसन्नताच नेहमी
कुबेरही खजील होय, ही मिजास मागतो


- नचिकेत जोशी (२८/८/२००८)

1 comment:

क्रांति said...

अद्वितीय मागणे!