(मैत्रीदिनाच्या निमित्ताने एक जुनी कविता पोस्ट करतोय)
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
वयाबरोबर मनात यावी तुझी नि माझी मैत्री
रानपाखरापरी असावी स्वच्छंदी, भिरभिरती
पानावरच्या दवबिंदूपरी चमचमती, थरथरती
पंखांमध्ये ताकद यावी दोघांच्या नात्याची
तिला मोकळे भरारण्या मग आसमंत अन् धरती
अशीच समजून उमजून यावी तुझी नि माझी मैत्री १
भांडायाला निमित्त व्हावे कसलेही, काहीही
भांडणातुनी मैत्री व्हावी अजुनी स्वच्छ, प्रवाही
जरी दुरावा आला क्षणीचा तरी दूरही व्हावा
मजबूत व्हावी घाव सोसुनी- कसलेही, काहीही
अबोल्यातही मुकी न व्हावी तुझी नि माझी मैत्री २
निघून जातील वर्षे आणि पडेल संध्याछाया
क्षण मैत्रीचे येतील धावून श्रांतवयी रिझवाया
या मैत्राची साथ निरंतर आठवणींची माया
आयुष्याची होईल सोपी वाट पुढे उतराया
त्या वाटेवर रुजून यावी तुझी नि माझी मैत्री ३
- नचिकेत जोशी (७/२/२००८)
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
वयाबरोबर मनात यावी तुझी नि माझी मैत्री
रानपाखरापरी असावी स्वच्छंदी, भिरभिरती
पानावरच्या दवबिंदूपरी चमचमती, थरथरती
पंखांमध्ये ताकद यावी दोघांच्या नात्याची
तिला मोकळे भरारण्या मग आसमंत अन् धरती
अशीच समजून उमजून यावी तुझी नि माझी मैत्री १
भांडायाला निमित्त व्हावे कसलेही, काहीही
भांडणातुनी मैत्री व्हावी अजुनी स्वच्छ, प्रवाही
जरी दुरावा आला क्षणीचा तरी दूरही व्हावा
मजबूत व्हावी घाव सोसुनी- कसलेही, काहीही
अबोल्यातही मुकी न व्हावी तुझी नि माझी मैत्री २
निघून जातील वर्षे आणि पडेल संध्याछाया
क्षण मैत्रीचे येतील धावून श्रांतवयी रिझवाया
या मैत्राची साथ निरंतर आठवणींची माया
आयुष्याची होईल सोपी वाट पुढे उतराया
त्या वाटेवर रुजून यावी तुझी नि माझी मैत्री ३
- नचिकेत जोशी (७/२/२००८)
1 comment:
Chhaan! :)
Post a Comment