पुन्हा भेटले दोघे अंतिम निर्णय घेण्यासाठी
पान उघडले, अखेर त्यांनी लिहून देण्यासाठी
कागद हाती, डोक्यामध्ये वादळ धुमसत होते
आर्त मनीचे ओळींवरती झरझर उतरत होते -
उपभोगांची नशिबाने आरास मांडली होती
दोन लेकरे नशिबाने झोळीत घातली होती
देहामध्ये सुखस्वप्नांची रंगत गेली मैफल
आईबाबा तयार झाले अखेर त्याग कराया
'कथाबीज चांगले मिळाले', एक म्हणे दुसर्याला
'डेलीसोप करूया याचा, शूट सुरू दसर्याला!'
- नचिकेत जोशी (३/३/२०१६)
पान उघडले, अखेर त्यांनी लिहून देण्यासाठी
कागद हाती, डोक्यामध्ये वादळ धुमसत होते
आर्त मनीचे ओळींवरती झरझर उतरत होते -
उपभोगांची नशिबाने आरास मांडली होती
दोन लेकरे नशिबाने झोळीत घातली होती
देहामध्ये सुखस्वप्नांची रंगत गेली मैफल
यथावकाशे तारुण्याचा उतरत गेला अंमल
तशी मुलांनी आपसात वाटून घेतली मायाआईबाबा तयार झाले अखेर त्याग कराया
डोळ्यांनी मग डोळ्यांची समजूत घातली काही
एका वाटेचा दोघांनी हट्ट ठेवला नाही -'कथाबीज चांगले मिळाले', एक म्हणे दुसर्याला
'डेलीसोप करूया याचा, शूट सुरू दसर्याला!'
- नचिकेत जोशी (३/३/२०१६)
No comments:
Post a Comment