कुलंग प्रस्तरारोहणाच्या माझ्या पहिल्यावाहिल्या expeditionची गोष्ट जवळजवळ संपूर्ण झालीच आहे. हा भाग फोटोत्सुक वाचकांसाठी आणि समारोपाच्या दोन पॅरासाठी.
आम्ही तिघे दुपारी मुक्कामापासून निघाल्यापासून नऊ तासांनी झापापाशी पोचलो, त्याची गोष्ट तुम्ही वाचलीच आहे. त्या दिवशी सूरजने सहाशेपैकी अडीचशे फुटांची चढाई केली. सूरज आणि संजय बेस कँपवर खाली उतरले तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. त्या दिवशी संध्याकाळी एक महत्त्वाचा निर्णय झाला, तो म्हणजे, जरी कुलंगची वॉल पूर्ण चढायच्या हेतूने आलो होतो, तरी मोहिमेच्या तिसर्या आणि शेवटच्या दिवशी अजून वर चढून न जाता, जेवढ्या उंचीपर्यंत आज चढाई पूर्ण झाली आहे तिथपर्यंत उद्या टीममधल्या प्रत्येकाला चढाई करण्याची संधी द्यायची. थोडक्यात, कुलंग व्हर्जिन वॉलच्या पहिल्या प्रयत्नात अडीचशे फुटांची चढाई हेच अंतिम ध्येय मान्य झालं. टीमवर्कच्या दृष्टीने बघता, प्राप्त परिस्थितीमधला हा एक नि:संशय अप्रतिम निर्णय होता. त्याप्रमाणे सर्वचजण (अगदी मास्टरशेफ मंदारसुद्धा) सूरज-संजयने गाठलेल्या अडीचशे फूटांवरती दुसर्या दिवशी आपापली पावले उमटवून आले.
कुलंगची पहिली मोहिम संपली. उतरताना प्रत्येकाकडेच भरपूर म्हणजे भरपूरच ओझे होते. त्यात मी माझं काही सामान तिथेच विसरून आलो होतो. ते तिथल्यापैकी कुणाचंच नसल्यामुळे ते सॅकमध्ये घेणं तर सोडाच, पण हातामध्येसुद्धा घ्यायला कुणीही तयार नव्हते असे मला मागाहून कळले. मग बिचार्या संजयने ते ओझे स्वतःकडे घेतले आणि पुण्यात मला सुखरूप आणून दिले.
श्वेताचा पाय अजूनही बरा झालेला नाही. उपचार चालू आहेत असे कळते.
पुढच्या मोहिमेचे प्लॅन आखून तयार आहेत.
प्रिय वाचकहो, आणि आता शेवटचे. सह्याद्रीमध्ये अशा प्रकारच्या मोहिमा अनेकांकडून होतात. त्यात आम्हाला जे अनुभव आले त्याहून बिकट, वाईट, चांगले, खडतर अनुभव त्या त्या वेळी येतात. सगळेच काही कागदावर उमटत नाहीत. ह्याचे मुख्य कारण म्हणजे, ह्या अस्सल ट्रेकर्सची अशा प्रकारच्या अनुभवांसाठी मानसिकता कायमच तयार असते. त्यामुळे, आठ तास उतरायला लागणे किंवा दुखापत झालेली असतानाही मोहिम पूर्ण करणे ह्या गोष्टी सहज घडून जातात. इच्छाशक्तीच्या जोरावर अशा अनेक मोहिमा आजवर पूर्ण झाल्या आहेत, आणि होत राहतील. अशा एका मोहिमेत मला सहभागी व्हायला मिळालं आणि असा भन्नाट अनुभव प्रत्यक्ष घेता आला हेच काय ते माझं भाग्य! बाकी सब - सह्याद्रीबाबा के हवाले! अशा सर्वच मोहिमांमध्ये एक गोष्ट कॉमन असते - ती म्हणजे सुरक्षिततेची घेतलेली काळजी. सुरक्षेचे सर्व उपाय करूनच अशी साहसे केली जातात. ह्या मोहिमांमध्ये सहभागी होताना आपणसुद्धा सुरक्षिततेसंदर्भात काय काय आयोजन आहे ह्याची माहिती घ्यायला हवी.
ह्या भागात फोटो आहेत, पण आधीच्या सर्व भागातलं फोटोशिवाय उभं केलेलं शब्दचित्र एवढ्या चिकाटीने तुम्ही वाचलंत ह्यात निर्विवादपणे तुमचं कौतुक आहे. त्याबद्दल मनापासून आभार.पुन्हा भेटूच!
आता सुरू करूया फोटो सफर - (आधी वर्णन आणि नंतर फोटो असा क्रम आहे. I hope फोटोतले संदर्भ तुम्ही आधीच्या भागात वाचले असल्यामुळे आठवतील)
equipment, इतर सामान. मागे आडवा पसरलेला अलंग आणि त्याच्या उजवीकडचा उंचवटा म्हणजे मदन. (फोटो - रोहन मालुसरे)
उजवीकडचा आडवा कुलंग. त्याच्या डावीकडे कमी उंचीचा एक डोंगर आहे. दोघांच्या मधल्या खिंडीत पोचण्याचे पहिल्या दिवशीचे ध्येय होते. कुलंगची डावी धार चढून जाण्याची मोहीम होती. डावीकडचा उंचवटा मदन.
या फोटोत कुलंग, त्याची डावी भिंत, खिंड आणि खिंडीच्या डावीकडचा डोंगर नीट दिसतोय. त्या डाव्या डोंगराच्या पोटात कपारी आहेत, जिथे आम्ही मुक्काम केला. खिंडीच्या 'V' चे खालचे टोक जिथे आहे, तिथपासून डावीकडे कपारींकडे पायवाट जाते, तर उजवीकडे कुलंगला खेटून पायर्यांकडे पायवाट जाते.
६०० फूट भिंत अजून झूम करून. भिंतीच्या उन्हात असलेल्या धारेवरून चढाई झाली.
निघालो! मागे मदन ते कुलंग! (फोटो - रोहन मालुसरे)
वाटेवर एके ठिकाणाहून दिसणारे मदनगडाचे नेढे
कळसुबाई
मुक्कामाची जागा
मुक्कामाच्या जागेवरून दिसणारा नजारा. उजवीकडे उंचीवर जो हिरवी झाडे असलेला डोंगर दिसतोय, त्याच्यापलिकडे खालच्या बाजूला झाप होता, जिथून सुरूवात केली. तसंच सरळ पुढे गेलं की आंबेवाडी.
कुलंगच्या पायर्यांवरून घेतलेला मदनगडापर्यंतचा फोटो. कुलंगनंतरच्या पहिल्याच डोंगराच्या पोटात मुक्कामाची जागा.
कुलंगच्या पायर्यांवरूनच मदनच्या सुळक्यांचा फोटो. सगळ्यात उजवीकडच्या डोंगराच्या पोटात पांढुरकं आणि त्याच्या लगेचच खाली एक भेग दिसतेय, exactly तीच मुक्कामाची कपार.
सगळ्यात उजवीकडे मदनगड, सगळ्यात डावीकडे कळसुबाई
कुलंगच्या पायर्यांची एक झलक
कुलंगवरून दिसणारा परिसर
Good Morning from the nest in the mountains
बेस स्टेशन
खिंडीतून पलिकडचा नजारा. सर्वात डावीकडे दिसतेय ती अलंगची लिंगी. तिच्या उजवीकडे रतनगड धुरकट दिसतोय.
अरूण सर in लीड क्लाईंबिंग
पहिले सत्तर-एक फूट सरांनी लीड क्लाईंब केलं. Now its Suraj to go next. फोटोत डावीकडून सर, संजय आणि सूरज
ओव्हरहँगच्या खाली सूरज. संजय बिले देताना.
त्याच पॅचवर अजून एक फोटो
सूरज अजून वर पोचला, बिले पोझिशनवर संजय आणि रूपेश
तिसर्या दिवशीची चढाई - Its a team reaching the destination! (फोटो - मिलिंद कुलकर्णी)
अडीचशे फुटांवरचा ग्रूप फोटो. मागच्या भिंतीचं सर्वोच्च टोक म्हणजे कुलंगचा माथा. (फोटो - मिलिंद कुलकर्णी)
हा ह्या ठिकाणावरून घेतला गेलेला पहिला फोटो. कारण अजूनपर्यंत इथे कुणीच पोचलं नव्हतं. फोटोत मदनगड आणि आम्ही राहिलो त्या कपारींच्या डोंगराचा टॉप दिसतोय. डावीकडे मागे कळसूबाई. (फोटो -
मिलिंद कुलकर्णी)
फायनली पुण्यात सुखरूप पोचलो. उजवीकडून रोहित, श्वेता आणि मी. (फोटो - रोहित सिंगर)
हॅट्स ऑफ टीम. (फोटो - रोहन मालुसरे). सागर आणि मालतेश ह्या फोटोत नाहीयेत. ते रात्री मुक्कामाला आले होते.
(समाप्त)
नचिकेत जोशी

7 comments:
भन्नाट लोक्स आहात! superb वर्णन! त्रिवार मुजरा तुम्हा सगळ्यांना!
Great blog! Finishing the story with pictures a good idea! Keep writing wonderful experiences!
फायनली नचिकेत जोशी यांनी या सिरीजचा The End केला . आणि एका यशस्वी दिग्दर्शक आणि लेखकाप्रमाणे वाचकांची उत्सुकता शेवटच्या भागापर्यंत ताणून नेऊन ठेवली. आम्हा वाचकांचा सॉलिड असा गेम केला. हळूहळू एक एक एपिसोड आपल्या शब्दांमध्ये गुंफत असा निर्माण केला की जे या व्यक्तिरेखांनमध्ये नव्हते त्यांनाही तिथे सोबत किंवा सहकलाकार असल्याचा फील येत गेला. आम्ही सुद्धा प्रत्यक्षात एक व्याक्तीरेखा साकारत असल्याने या एपिसोडशी एक जवळीक निर्माण होत गेली.. नची लेखकाच्या अंगी असलेली सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि शब्दभांडार हे तुझ्याकडे आहेच.. त्यामुळे अशीच या पुढेही तुझ्या पायाला भिंगरी लागो आणि अशीच लेखननिर्मिती घडो ..
कलाक्षेत्रातील एक सत्य (माझ्या मते )
कोणतीही कलानिर्मिती घडत असताना त्यामागे एक घुसमट एक वेदना एक जखम एक तळमळ एक आवेग एक ऊर्जा एक स्त्री असतेच ..का कुणास
व्वा झकास नचि
नचि, अत्यंत सुरेख ओघवते लिखाण सगळ्या भागांचे. फोटोही अप्रतीम आलेत. बर्याच दिवसांनी पुर्वाश्रमीचा नचि भेटला. आता हा भटकंतीचा व लिखाणाचा ओघ असाच वाहता राहो.
It was a great time reading all the blogs...
Me khup enjoy kela...
Keep writing...😊😊
नचिकेत सर ... केवळं आणि केवळं अप्रतिम लिखाण ... सगळे ब्लॉग तुमच्या लेखन सामर्थ्याने गुंतवून ठेवतात. कमाल लिहलंय
Post a Comment