Pages

Sunday, February 10, 2008

हाक

धुक्यात जाती हरवून वाटा
चिंब चमकती नवथर पाने
झाकून घे‌ई धरा स्वत:ला
गर्द नव्या हिरव्या गर्दीने

गर्दी नेई अवखळ पाणी
शेते गाती निर्झर गाणी
गंधित सुमने हर्षित सु-मने
वेचित जाती कुणी मैत्रिणी

मैत्रिणी त्या पाहून वाटे
हे तर देवाघरचे नाते
तप्त कोरड्या मार्गावरती
सुखसम शीतल छाया वाटे

या वाटेने चालत असता
आठव येई तुझा निरंतर
ऐक हाक ही तुझ्या मनाची
हट्ट सोड बघ वाढे अंतर

अंतर मिटुनी गवसावी ती
वाट धुक्यातील कुणी अनामी
सहवासाची आस प्रवासा
परतुन ये तू... उभा इथे मी!

नचिकेत (३०/९/२००६)

No comments: