मनास वाटे असेच व्हावे
कुणा सखीच्या मनी भरावे
झळा उन्हाच्या, जिवास तलखी
बनून छाया तिला जपावे
जरी दिसाया नसलो सुंदर
सुन्दर आहे, तिला पटावे
चिडून, "गेला उडत" म्हणावे
मलाच घेउन तिने उडावे
दवात न्हाता पहाट, स्वप्नी-
तिने मला, मी तिला पहावे
कधी उरे जर रिते रितेपण
तिचे तिचेपण भरुन घ्यावे*
कळेल भाषा दिठी-मिठीची
असे रुजावे, असे फुलावे
- नचिकेत(१४/४/०७)
(* सानी मिसऱ्यासाठी विनायकला धन्यवाद..)
No comments:
Post a Comment