Pages

Thursday, February 16, 2012

वार्‍यामागे पळतो आहे

वार्‍यामागे पळतो आहे, क्षणभर उसंत नाही
वारा कोठे नेतो हा मुद्दाही ज्वलंत नाही

हवाहवासा एक विसावा मला मिळाला आहे
उन्हात सरलेल्या वाटांची कसलीच खंत नाही

मीच नेहमी शब्दांसाठी वणवण भटकत असतो
त्यांनी वाट पहावी, इतका मी भाग्यवंत नाही

तुला मिळविणे हाती नाही, गमावणेही नाही
यांच्यामधल्या प्रवासासही कोठेच अंत नाही

अमुचे नाते तार्‍यांना सोपवून यावे म्हणतो
मीही आता थकलो आहे, तीही जिवंत नाही

- नचिकेत जोशी((२५/११/२०११)

******************
लेकीच्या लग्नाची त्यांना फार काळजी आहे
(गाडी, बंगलाही नसणारा मुलगा पसंत नाही!)

3 comments:

mekhala said...

apratim sir!!!!

a said...

Excellent

ulhasbhide said...

छान गझल .....
दुसरा आणि तिसरा हे शेर अधिक आवडले.