Pages

Monday, July 30, 2012

गुंफण

दु:ख पुरातन
दु:ख चिरंतन
दु:ख जगाच्या
घरचे अंगण

दु:ख मोहवी
दु:ख बोलवी
दु:ख खुळ्या
पायातील पैंजण

दु:ख उराशी
दु:ख उशाशी
दु:ख सोबती
बनून कांकण

दु:ख चिडचिडे
दु:ख तडफडे
दु:ख सनातन
शाश्वत वणवण

दु:ख एकटे
दु:ख धाकटे
दु:ख थोरल्या
सुखास कारण

दु:ख मल्मली
दु:ख भरजरी
दु:ख सुखाशी
अतूट गुंफण!

 - नचिकेत जोशी (११/६/२०१२)

4 comments:

Abhishek Ashtekar said...

अप्रतिम कविता.
आपण निवडलेला छंद अगदी चपखल आहे
आपल्या प्रतिभाशक्तीला सलाम

Anonymous said...

खूपच छान.
तुमच्या ओळी वाचल्या नंतर माझ्या मनात आलेल्या ओळी.
" दुःख जवळ करावे
दुःख उराशी धरावे
दुःख नेहमी तरावे
सुखावरी "

नचिकेत जोशी said...

thanks!!

Anonymous, I would have been more happy had u had posted those lines by ur real name...

next time!

Nachiket

अनिता म. कांत said...

दु:ख खुळ्या पायांतील पैंजण : खूप सुंदर, नादावलेले शब्द; छान लिहित आहात.

-अनिता