दाटते आभाळ त्याच्या स्वागताला
गाठते क्षितिजावरी त्या पावसाला
साजणीला भेटण्या आतूर झाला
वाट आभाळातली सोडून आला
मुक्त पागोळ्या उड्या घेतात खाली
चिंब रांगोळी सुवासिक अंगणाला
थेंब ओघळले तिच्या देहावरी अन्
गंध मोहरता नवा मातीस आला
भेट होऊ द्या अशी एकांत जागी!
पाठवा जमिनीत भिजलेल्या नभाला
वाट ओली पावलांना साद घाली
रान ओले दाखवी भय पाखराला
सातही रंगांमध्ये पाऊस मनभर!
काजळाचा रंग माझ्या श्रावणाला!
- नचिकेत जोशी (१७/६/२०१४)
गाठते क्षितिजावरी त्या पावसाला
साजणीला भेटण्या आतूर झाला
वाट आभाळातली सोडून आला
मुक्त पागोळ्या उड्या घेतात खाली
चिंब रांगोळी सुवासिक अंगणाला
थेंब ओघळले तिच्या देहावरी अन्
गंध मोहरता नवा मातीस आला
भेट होऊ द्या अशी एकांत जागी!
पाठवा जमिनीत भिजलेल्या नभाला
वाट ओली पावलांना साद घाली
रान ओले दाखवी भय पाखराला
सातही रंगांमध्ये पाऊस मनभर!
काजळाचा रंग माझ्या श्रावणाला!
- नचिकेत जोशी (१७/६/२०१४)
1 comment:
निव्वळ अप्रतिम नचिकेतजी, तुमच्या कविता , गजल मनाला प्रचंड भावतात. तुमच्या ब्लॉगवरील सर्व गजल, लेख, कविता कित्येकदा वाचून काढल्या आहेत. असेच लिहित रहा
Post a Comment