लागणारा वेळ: ३०-३५ मिनिटे
लागणारे जिन्नस -
१. करवंदे (कच्ची किंवा पिकलेली कुठलीही चालतील. कच्ची असल्यास सार पिवळसर होईल, पिकलेली असल्यास लालसर. - इति स्त्रोत.)
२. फोडणीचे साहित्य (जिर्याची फोडणी, लसूण, कडीपत्ता, तिखट, उडीद किंवा मसूर डाळ)
३. मिरच्या-कोथिंबीर (आवडीनुसार)
४. तिखट-मीठ-गूळ (आवडीनुसार व चवीनुसार)
कृती -
१. लगदाटाईप दिसू लागेपर्यंत गरम पाण्यात करवंदे उकडून घ्यावीत. (इंडक्शन कू़कटॉप वर २०० डिग्रीला साधारण वीस मिनिटे). उकळत असतांना करवंदांचा रंग बदलू लागतो. मी पिकलेल्या करवंदांची केल्यामुळे लालसर रंग आला होता.
२. उकळून झाल्यावर पाणी वेगळे काढून घ्यावे. ते नंतर वापरता येईल.
३. उकळल्यामुळे मऊ झालेल्या करवंदांच्या बिया काढून घ्याव्यात. नंतर त्यांचा गर एकत्र करावा.
४. करवंदांचे बाजूला काढलेले पाणी आणि गर यांची एकत्रित मिक्सरमधून काढून पेस्ट करून घ्यावी. (लसूण आवडत असल्यास तीही घालावी)
५. नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात जिरे, तिखट, उडीद/मसूर डाळ घालून ही पेस्ट घालावी.
६. साखरेऐवजी गूळ घालावा. (आवडत असल्यास)
७. उकळी येईपर्यंत मंद आचेवर ठेवावे.
८. करवंदांचे सार रेडी!
विसू: या पदार्थाला बेसनही लावता येते. आम्ही विदाऊट बेसन खाल्ले त्यामुळे मी तशी पाकृ लिहिली आहे.
अवांतरः मी केलेले सार चवीलाही उत्तम झाले होते. (आंबटगोड, मध्यम घट्ट)
स्त्रोतः आंबिवली गावातील (पेठ किल्ला उर्फ कोथळीगडाच्या पायथ्याचे गाव) सौ. सावंत काकू.
दोन वर्षांपूर्वी कोथळीगडाचा पौर्णिमेच्या रात्री ट्रेक केला होता. त्यावेळी दुसर्या दिवशी त्यांच्याकडे जेवणात हे सार होते. या पदार्थाला तिकडे 'करवंदांची कढी' म्हणतात. पण या कृतीमध्ये बेसन पीठ वापरले नसल्यामुळे 'सार' म्हटले आहे. शेवटी नावात काय आहे, असा विचार करायचा आणि सार/कढी जे म्हणू त्याचा - आस्वाद घ्यायचा!
- नचिकेत जोशी

No comments:
Post a Comment