Pages

Thursday, January 10, 2013

धुंदीत मी!


आज आहे नेमका शुद्धीत मी
आज कळले! ना तिच्या गणतीत मी!

जाच होऊ लागला माझा तुला
आणि रेटत राहिलो ही प्रीत मी!

आपलीशी वाटली दु:खे तिची
कोणत्या होतो अशा धुंदीत मी?

वाट स्वीकारून ती गेली पुढे
अन् तिच्यासाठी उभा खिडकीत मी!

मोडल्या चाली, बदलले शब्दही!
गात गेलो फक्त माझे गीत मी

ही तुझी पुरते नशा गझले, मला!
वेगळी नाही अजुन मग 'पीत' मी!

नचिकेत जोशी (१०/१/२०१३)

Wednesday, January 2, 2013

स्वागत २०१३ - सुधागडच्या माथ्यावरून...

२०१३ चा पहिला सूर्योदय सुधागडवरून पाहिला. हवामान ढगाळ असल्यामुळे सूर्यरावांनी पहिल्याच दिवशी 'लेटमार्क' नोंदवला. धनगड डोंगररांगेच्या पाठीमागून या सूर्योदयाची काही प्रकाशचित्रे -नचिकेत जोशी