भावनेशी पार माझ्या खेळून चेहरा गेला
रंगणारा खेळ अर्धा मोडून चेहरा गेला
मैफलीचे श्रेय माझ्या नाही कधी मना आले
भैरवीला नाव माझे गाऊन चेहरा गेला
बोलतो मी साचलेले माझ्या मनी दर्पणाशी
जाणतो तो, कान माझे टोचून चेहरा गेला
सारखे ऐसेच व्हावे, शब्दांवरी विसंबावे
"जोडण्या आलो" म्हणाला, तोडून चेहरा गेला
सावरोनी मी कुठेसा वावराया सिद्ध झालो
घाव वर्मी सांत्वनाचा घालून चेहरा गेला
नचिकेत(१८/३/०७)
Saturday, February 16, 2008
सखी
मनास वाटे असेच व्हावे
कुणा सखीच्या मनी भरावे
झळा उन्हाच्या, जिवास तलखी
बनून छाया तिला जपावे
जरी दिसाया नसलो सुंदर
सुन्दर आहे, तिला पटावे
चिडून, "गेला उडत" म्हणावे
मलाच घेउन तिने उडावे
दवात न्हाता पहाट, स्वप्नी-
तिने मला, मी तिला पहावे
कधी उरे जर रिते रितेपण
तिचे तिचेपण भरुन घ्यावे*
कळेल भाषा दिठी-मिठीची
असे रुजावे, असे फुलावे
- नचिकेत(१४/४/०७)
(* सानी मिसऱ्यासाठी विनायकला धन्यवाद..)
कुणा सखीच्या मनी भरावे
झळा उन्हाच्या, जिवास तलखी
बनून छाया तिला जपावे
जरी दिसाया नसलो सुंदर
सुन्दर आहे, तिला पटावे
चिडून, "गेला उडत" म्हणावे
मलाच घेउन तिने उडावे
दवात न्हाता पहाट, स्वप्नी-
तिने मला, मी तिला पहावे
कधी उरे जर रिते रितेपण
तिचे तिचेपण भरुन घ्यावे*
कळेल भाषा दिठी-मिठीची
असे रुजावे, असे फुलावे
- नचिकेत(१४/४/०७)
(* सानी मिसऱ्यासाठी विनायकला धन्यवाद..)
हुंदका
हुंदका साधा तुझा सांगून गेला
टाळले तू, मात्र तो बोलून गेला
दाटले आभाळ जे तव पापणीला
कोरलेले भाळ ते दावून गेला
पार होता वेस संगे गाव माझा
लक्तरे वेशीवरी टांगून गेला
भय अखेरी संपले कैसे म्हणावे?
बाहुला काळा घरा रांगून गेला
घसरलो तेव्हा कुठे मज भान होते?
संचिताचा दीप तेजाळून गेला
बोलते झालोच ना? मग पाहताना
दाह का नजरेतला जाळून गेला?
नचिकेत (९/४/२००७)
टाळले तू, मात्र तो बोलून गेला
दाटले आभाळ जे तव पापणीला
कोरलेले भाळ ते दावून गेला
पार होता वेस संगे गाव माझा
लक्तरे वेशीवरी टांगून गेला
भय अखेरी संपले कैसे म्हणावे?
बाहुला काळा घरा रांगून गेला
घसरलो तेव्हा कुठे मज भान होते?
संचिताचा दीप तेजाळून गेला
बोलते झालोच ना? मग पाहताना
दाह का नजरेतला जाळून गेला?
नचिकेत (९/४/२००७)
पाऊलवाट
सगळं कसं बदलत चाललंय!
हे जाणवतंय की, दूर दूर चाललंय...
ओळखीचे शब्दही आता अनोळखीपणे कानावर येऊ लागलेत,
कधीकाळी अंतराच्या पार गेलेले ते आता खरंच अंतरु लागलेत...
काही ओळखीच्या खुणा सापडताहेत का? - मी शोधतोय.
वेगळ्या झालेल्या वाटांना जोडणाऱ्या वाटेची मी वाट पाहतोय
रंगलेल्या मैफली आणि भावस्पर्शी सोहळे आता इतिहासजमा झालेत
निरोप घेतल्याचा शिक्का माझ्यावर मारुन सगळे मोकळे झालेत...
त्यांनी प्रवासाच्या वाटेवरची
माझी पावलंच पाहिली
त्या पावलांचं एकटेपण
त्यांना दिसलंही नाही, जाणवलंही नाही
आता वाटेत काळ्या रात्री भेटतात,
कभिन्न पहाड उभे ठाकतात
वळणावळणाच्या रस्त्याने त्यातून पुढे जाणं चालूच आहे,
नव्या गावांना भेटी देणं चालूच आहे
घाटरस्त्यातल्या गाडीच्या हेडलाईटसारखी मधूनच
त्यांची आठवण उजळते-
तेवढीच चार पावलं लवकर पार होतात
हेडलाईट वळणावर दिसेनासा होतो,
आठवण मात्र गाडीच्या आवाजासारखी साथ देते
ते नाहीशा झालेल्या गाडीसारखे केव्हाच नजरेपार झालेत

कधीतरी परिचित हाक कानी येते
समजावणीच्या चार शब्दांचं दान
न मागताच माझ्या ओंजळीत टाकून जाते
मग पुढचं सगळं अपरिचित होऊन जातं
परत एकदा माझं मन माझ्यातच मिटून जातं
पावलांचे ठसे मात्र शहाणे होत जातात
प्रवासी पक्ष्यांची क्रमश: कहाणी होत जातात
कहाणीच्या सुखद शेवटाची मी वाट पाहत असतो
खऱ्या होणाऱ्या संकेतस्वप्नांची पहाट पाहत असतो
पण पहाटेच्या धुक्यात सगळे हरवून गेलेत

पण वळणावळणाच्या अशाच एका वाटेनेही मला समजावलंय
"काही शिक्के स्यमंतकासारखे असतात,
ते पुसण्यासाठी काळच जावा लागतो.
आणि पावलांचं एकटेपण दिसायलाच हवं असं नाही..."
नवं गाव जवळ येत चाललंय
आता परत सगळं कसं बदलत चाललंय!
- नचिकेत(२९/१/०७)

Sunday, February 10, 2008
हाक
धुक्यात जाती हरवून वाटा
चिंब चमकती नवथर पाने
झाकून घेई धरा स्वत:ला
गर्द नव्या हिरव्या गर्दीने
गर्दी नेई अवखळ पाणी
शेते गाती निर्झर गाणी
गंधित सुमने हर्षित सु-मने
वेचित जाती कुणी मैत्रिणी
मैत्रिणी त्या पाहून वाटे
हे तर देवाघरचे नाते
तप्त कोरड्या मार्गावरती
सुखसम शीतल छाया वाटे
या वाटेने चालत असता
आठव येई तुझा निरंतर
ऐक हाक ही तुझ्या मनाची
हट्ट सोड बघ वाढे अंतर
अंतर मिटुनी गवसावी ती
वाट धुक्यातील कुणी अनामी
सहवासाची आस प्रवासा
परतुन ये तू... उभा इथे मी!
नचिकेत (३०/९/२००६)
चिंब चमकती नवथर पाने
झाकून घेई धरा स्वत:ला
गर्द नव्या हिरव्या गर्दीने
गर्दी नेई अवखळ पाणी
शेते गाती निर्झर गाणी
गंधित सुमने हर्षित सु-मने
वेचित जाती कुणी मैत्रिणी
मैत्रिणी त्या पाहून वाटे
हे तर देवाघरचे नाते
तप्त कोरड्या मार्गावरती
सुखसम शीतल छाया वाटे
या वाटेने चालत असता
आठव येई तुझा निरंतर
ऐक हाक ही तुझ्या मनाची
हट्ट सोड बघ वाढे अंतर
अंतर मिटुनी गवसावी ती
वाट धुक्यातील कुणी अनामी
सहवासाची आस प्रवासा
परतुन ये तू... उभा इथे मी!
नचिकेत (३०/९/२००६)
"Magazine पाहावं काढून" - एक स्मरणयात्रा
२१ एप्रिल २००३, रात्री ११.३०
आजचा दिवस मी कधीही विसरणार नाही, कध्धीच नाही! हा दिवस भाग्याचाच! माझं आणि आमच्या साऱ्यांचं लाडकं स्वप्न असलेल्या पहिल्या CD-magazine चं प्रकाशन आज झालं. ज्यासाठी आम्ही गेले ७-८ महिने अविरत, प्रचंड ध्यासाने कष्ट घेतले, एका भव्य, उच्च, स्वप्नासाठी आमचे दिवस दिले, आमच्या रात्री दिल्या, त्या CD-magazine चं उद्घाटन आज दुपारी Mechanical Room - 13 मध्ये प्राचार्य घाटोळ सरांच्या हस्ते, टाळ्यांच्या गजरात पार पडलं.
सकाळी stickers मिळाली. magazine team ने सर्वच्या सर्व सीडीज् ना (नेमका आकडा माहीत नाही, पण कमीत कमी ९००) stickers लावण्याचं काम अवघ्या तासाभरात पूर्ण केलं. simply great! दुपारचा मुख्य कार्यक्रम short but sweet झाला. सर्व HODs हजर होते. Mechanical Room - 13 full झाली होती.
कार्यक्रमात magazine ची छोटीशी झलकही दाखवली. प्रचंड टाळ्यांनी magazine चं स्वागत झालं. magazine team तर्फ़े मी ( मराठीत) मनोगत व्यक्त केलं. मनोगत व्यक्त करताना आवाज नव्हे, पण मन भरून आलं होतं.
कार्यक्रम संपल्यावर सावंत सर प्रचंड खुश होते. आम्हा सर्वांचं त्यांनी खूप खूप खूप कौतुक केलं. येताना हॉस्टेल वर चक्कर मारुन आलो. I block च्या जवळ जवळ सगळ्या rooms मध्ये magazine चीच चर्चा होती.
एक प्रकारची जबाबदारी पार पाडल्याची कृतार्थता आज दुपारपासून जाणवतेय.....
सध्या मी खूप दमलोय... मन मात्र ’क्षण - पळ- तास - दिन’ ओलांडून मागेच धावतंय... आता उरल्या आहेत, मागील ७-८ महिन्यातल्या क्षण श्रींमंत केलेल्या आठवणी.....
***********
दि २ ऑगस्ट २००२ रात्री ११.००
.... या वर्षी department चं स्वतंत्र magazine काढायचंय. magazine पुढच्या sem मधे निघेल, पण त्याची तयारी ह्या sem पासून सुरु करायला हवी...... आणि हे मला मनापासून करायचंय...
२५ ऑगस्ट २००२ रात्री ११.००
....department magazine ही काही साधीसुधी गोष्ट नसेल, असं मला वाटायला लागलंय. Actually आतापर्यंत "Comp-ENTC-IT" असं एकच असलेलं आमचं department यावर्षी पासून "ENTC" आणि "Comp-IT" अशा दोन स्वतंत्र Dept. मध्ये विभागलं गेलंय. त्यामुळे यावर्षीचं आम्ही काढत असलेलं magazine,Comp-IT चं पहिलं magazine असेल. आणि नवीनच काहीतरी करतोय तर पारंपारिक पुस्तक magazine च्या ऎवजी html च्या format मध्ये काही करता येईल का, असा विचार आमच्या मनात सुरु झालाय. पण त्यातही नेमकं कसं, याबाबत काहीच माहिती नाही. Let’s see...... सावंत सर काय म्हणतात ते बघू...
१८ डिसेंबर २००२ दुपारी १२.००
...... यावेळचं आमचं magazine अत्यंत वेगळं असेल. आम्ही CD-Magazine काढतोय. आतापर्यंत पुस्तकरुपातच ओळखीचं वाटणारं magazine आता "CD" वर येईल.COEP च्या इतिहासात आत्तापर्यंत न घडलेली गोष्ट आम्ही करणार आहोत.(म्हणजे नक्की CD कशी असेल, हे आत्ताच विचारु नका! मलाही माहित नाहीये.)
सध्या फ़क्त स्वप्न पाहिलंय! अर्थात त्यासाठी प्रचंड मेहनत आहे. आज हे सगळं final झालं. आता magazine निघेल, ते CD वरच! खर्चाच्या बाबतीतही पुस्तक magazine पेक्षा अतिशय स्वस्तात जाईल. आणि तंत्रज्ञान शिकतोय ते implement करण्याची उत्तम संधी यातून मिळेल. एक नवा पायंडा पडेल. परमेश्वर आमचा सांगाती होवो!
१ जाने २००३ रात्री १२.००
... दिवसकाळाचं सध्या भानच नाहीये. विचार करायलाही वेळ नाहीये. हां हां म्हणता सुट्टी संपली, उद्यापासुन college सुरु होणार आहे (असं सांगितलं गेलंय!) पण या पूर्ण सुटीत आपण दोनदाच भेटलोय १८ तारखेला आणि आज.
... मी सध्या CD magazine मध्ये पूर्ण busy आहे. गेले ३-४ दिवस सुमेधच्या घरी त्याचं काम सुरु आहे. काल रात्री अणि परवा फ़क्त अर्धा तास झोपलोय! खरोखर रात्रभर जागून काम करतोय. सध्यातरी learning चालू आहे interface try करतोय, software शिकतोय. दर ३-४ दिवसात नवं s/w सापडतं मग ते try करायचं, मग त्यात settle होइपर्यंत वेळ जातो. असो. अर्थात पहाटे ४.३० नंतर फ़ारसं काम होतं नाही. रोज सकाळी घरी येतो. आज सकाळी साडेसहाला घरी आलो. 15km @ 6.30am- आणि गम्मत म्हणजे आज सकाळी यावर्षीच्या थंडीतलं सर्वात कमी temperature होतं! 6.2 oC!! enjoying !!
तर अशा प्रकारे magazine डोक्यात चढतंय - अक्षरश: झोकून देउन काम करतोय. अर्थात ही तर सुरुवात आहे, अजून खूप चालायचंय!
सध्या खूप दमलोय... पुन्हा भेटू कधीतरी!
४/२/०३ रात्री १०.४५
काल फ़िरोदिया शो झाला.... आता पुनश्च: mag!.
articles यायला हळूहळू सुरुवात झाली आहे. काही seniors ला त्यासाठी पर्सनली भेटावं लागेल. Interface वर सुमेध-अन्या-दर्शन ने खरंच खूप मेहनत घेतली आहे. हळूहळू ’समूर्त’ होऊ लागलंय सगळं...
दि. २ मार्च २००३ सकाळी ११.००
काल सेंच्य़ुरियन पार्क वर भारत-पाकिस्तान ची world-cup मॅच झाली. You should believe - we missed it! मी फ़क्त last 5 overs पाहिल्या. दर्शन-सुमेधने ते ही नाही! काल सुमेधच्या घरी magazine चं काम चालू होतं. सोनाली कुलकर्णी चा interview मिळालाय. Actully आमचा senior विनायकने मागच्या वर्षीच्या magazine साठी घेउन ठेवला होता. पण Colour pages साठी खर्च वाढत असल्यामुळे त्यांना तो नाईलाजाने वगळावा लागला. (मी त्याला म्हटलं don’t worry! आम्हाला असा Colour pages चा problem च नाही. इथे KB/MBची गणितं आहेत, त्यामुळे जागाही आहे!)
२५ मार्च २००३, रात्री १०.३०
Magazine चं नाव अजूनपर्यंत सुचत नव्हतं, पण आता तो problem solve होईल. अनिरुद्धने भारी शब्द शोधलाय - "Revista"! याचा अर्थ स्पॅनिश भाषेत magazine! आणि आपलं mag softcopy असेल, तसंच आम्ही ते site वर upload करण्याचा विचार करतोय, So "e-Revista"! बहुदा हेच final होईल. खरं सांगायचं तर माझ्यामते magazine चं नाव revista असणं, म्हणजे एखाद्या मुलाचं नाव ’मुलगा’ हे ठेवण्या सारखं आहे.
पण तरीही... It’s ok!
magazine आता ’दिसायला’ लागलंय. जवळ जवळ सगळ्या sections चे tabs, त्यांची positions, ‘on-click’ events दिसताहेत.... मला खूप छान वाटतंय hats off to all of us! still to go..!
२ एप्रिल २००३ रात्री ११.००
...आम्ही ३१ मार्च ही deadline ठेवली होती. पण बरेच problems आले.३१ मार्च ची दुपार ते १ एप्रिल ची संध्याकाळ असं almost सलग १९ तास आम्ही दर्शनच्या घरी काम केलंय. This was the peak! एखाद्या गोष्टीचा कळस गाठणं म्हणतात, तसा कष्टांचा कळस झाला होता गेल्या २ दिवसात! अक्षरश: मेहनतीची हद्द झाली! पण still we enjoyed! मित्रांनो actually नेमके problems काय आले ते explain करुन इथे लिहिता येत नाहीये. एवढंच सांगतो, सगळे software problems होते, जवळ जवळ सगळा Data मिळालाय, त्याचं compilation आणि gathering चालू आहे...
आता नवी डेड लाईन आहे - १० एप्रिल!
आता फ़क्त magazine team चं मनोगत लिहायचं बाकी आहे, ते २-३ दिवसांत पूर्ण होईल.
१० एप्रिल २००३ रात्री १०.३०
आजही deadline पूर्ण झालीच नाही. But we are all ready now! mag covers printing ला द्यायचं बाकी आहे, "magazine पाहावं काढून" हे magazine team तर्फ़े मी लिहीलेलं मनोगत परवा सुमेधला BC वर ऐकवलं.
माझं वाचन संपल्यावर त्याचे भरुन आलेले डोळे खूप काही सांगून गेले...
१९ एप्रिल २००३ रात्री ११.३०
आज संध्याकाळी magazine demo पाहिला.
परवा inaug आहे. त्यासाठी आज एक trial घेतली. Every thing was fine. एकच problem आहे.
CD-stickers! सोमवारी जर सर्वांना CDs(at least all HOD’s, principal) द्यायच्या असतील तर उद्या stickers मिळायलाच हवीत!
We are all waiting now... फ़क्त "त्या" क्षणाची वाट पाहतोय. आम्ही सर्वांनीच खूप मेहनत घेतली आहे... फ़क्त उत्सुकता आहे आता... सीडी मॅगझीन चं स्वागत कसं होईल ? सीडी आवडेल का?
**************
२१ एप्रिल २००३ रात्री ११.३०
........ शक्य तिथपर्यन्त एकमेकांना सांभाळून घेत, अनेक अडचणींना तोंड देत, कष्टांची फ़िकीर न करता आम्ही आमचं ध्येय गाठलं. आमच्यापैकी कुणीच ‘inborn ‘ leader, manager नव्हता. जिथून सुरुवात केली ते ठिकाण म्हणजे एक शून्य होतं. सर्वस्वी वेगळ्या प्रवाहाची सुरुवात आम्ही केली. आज magazine चं inaug झाल्या दिवशी मला त्या सर्वांचीच आठवण येते, ज्यांनी ह्या कामात स्वत:च्या परीने १००% योगदान दिलं. थोडी साहित्यिक भाषा वाटेल, पण magazineच्या क्षेत्रात एक नवीन प्रवाह सुरु करण्याचं स्वप्न पाहिलेल्या, आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आपापल्या परीने सर्वोत्कृष्ट प्रयत्न केलेल्या माझ्यासारख्याच सामान्य मित्र-मैत्रिणींची ‘e-revista’ ही एक असामान्य आणि कष्टसाध्य कलाकृती आहे.
अगदी article type करुन देण्याचीही classmates नी स्वत:हून तयारी दाखवली. ’sponsorship’ पासून अगदी शेवटच्या क्षणी आलेल्या ‘CD sticker’ चिटकवण्याच्या कामापर्यंत अनेकांनी ‘स्वत:चं’ समजून योगदान दिलं.... पु. लं. च्या शब्दात सांगायचं झालं तर ‘यात्रा संपत आली की आठवणींची ही चित्रं डोक्यात गर्दी करतात’...
"Mission E-Revista" संपलं. आता उरल्या आहेत त्या फक्त आठवणी आणि त्या अविस्मरणीय क्षणांच्या स्मरणयात्रा...!
नचिकेत जोशी
(Chief Co - ordinator, E-Revista 2002-03)

Tuesday, February 5, 2008
साद
सांजवेळी, दूर रानी,
साद घातली मला कुणी?
हिरव्या देठी, चिमण्या ओठी,
शीळ घातली खुळी कुणी? १
नभांगणाच्या हमरस्त्याने
पक्षी चालले माघारी
कि संध्येच्या नयनी रेखिले
काजळ ते आतुर कुणी? २
दिवेलागणी होता उमटे
बालसूर तो श्लोकांचा
गोशाळेतुन जणू किणकिणे
मंजुळशी गोमाय कुणी! ३
कडे-कपारी न्हाऊन निघती
संधिकाली त्या किरणांनी
समर्पणाचे तेज हे दिधले
जाता जाता मला कुणी? ४
मनामनाला करते कातर
वेळ ही हळवी क्षणोक्षणी
की चित्ताला शान्तवाया
निर्मिली ही सांज कुणी? ५
मला न ठावे कोण असे तो
सूत्रधार या खेळाचा
खेळगडी तो असेल माझा
की खेळाचा जनक कुणी? ६
- नचिकेत (२४/६/२००६)
साद घातली मला कुणी?
हिरव्या देठी, चिमण्या ओठी,
शीळ घातली खुळी कुणी? १
नभांगणाच्या हमरस्त्याने
पक्षी चालले माघारी
कि संध्येच्या नयनी रेखिले
काजळ ते आतुर कुणी? २
दिवेलागणी होता उमटे
बालसूर तो श्लोकांचा
गोशाळेतुन जणू किणकिणे
मंजुळशी गोमाय कुणी! ३
कडे-कपारी न्हाऊन निघती
संधिकाली त्या किरणांनी
समर्पणाचे तेज हे दिधले
जाता जाता मला कुणी? ४
मनामनाला करते कातर
वेळ ही हळवी क्षणोक्षणी
की चित्ताला शान्तवाया
निर्मिली ही सांज कुणी? ५
मला न ठावे कोण असे तो
सूत्रधार या खेळाचा
खेळगडी तो असेल माझा
की खेळाचा जनक कुणी? ६
- नचिकेत (२४/६/२००६)
Subscribe to:
Posts (Atom)