Pages

Saturday, February 16, 2008

चेहरा

भावनेशी पार माझ्या खेळून चेहरा गेला
रंगणारा खेळ अर्धा मोडून चेहरा गेला

मैफलीचे श्रेय माझ्या नाही कधी मना आले
भैरवीला नाव माझे गाऊन चेहरा गेला

बोलतो मी साचलेले माझ्या मनी दर्पणाशी
जाणतो तो, कान माझे टोचून चेहरा गेला

सारखे ऐसेच व्हावे, शब्दांवरी विसंबावे
"जोडण्या आलो" म्हणाला, तोडून चेहरा गेला

सावरोनी मी कुठेसा वावराया सिद्ध झालो
घाव वर्मी सांत्वनाचा घालून चेहरा गेला

नचिकेत(१८/३/०७)

1 comment:

Pooja said...

Chehara..luved it!!