Pages

Tuesday, March 15, 2011

मूव्ह ऑन! ...

मूव्ह ऑन! ...
तसं सोप्पं आहे म्हणायला आणि वागायलाही!
काळ्या गर्द ठसठसणार्‍या रात्रींना हे रोज समजावण्याचा प्रयत्न करतोय मी!
त्यांची समजूत काही अजून पटलेली नाहीये!!
आठवणींच्या झुंडी आठवड्याच्या बाजारासारख्या
आजही त्यांच्या प्रहरांवर टोले देत असतात..
ते हल्ले सोसून दिवसा मूव्ह ऑन व्हायची सवय
आत्ता कुठे लागते आहे!

नवे वसंत, गालिचे, काटे, झरे, निखारे, पाऊस, सावल्या...
दिवस संपतो आणि पुन्हा बाजार भरतो रात्री - जुन्या फुलांचा..

सुकलेल्या फुलाला, मुकलेल्या वसंताला,
हुकलेल्या प्रेमाला आणि चुकलेल्या रात्रीला
सोडून पुढे जाण्याची हिंमत नसली की मग
निदान स्वत:शीच म्हणायलाही खूप उपयोगी पडतं असं -
मूव्ह ऑन!!

नचिकेत जोशी (१४/३/२०११)

2 comments:

Lalit Deshpande said...

Aprateem kavita Nachiket!

'Accept' ani 'Move On' he shabda kharach aapalya pidhichya lokanchya (ani aaplya suddha) bolnyaat atyanta common zale ahet, thanks to the 'dynamic' nature of things.

'Moving On' ya critical phase madhe honaari sagali ghusmat agadi yathaarta maandlies.

~Lalit

नचिकेत जोशी said...

Thanks Lalit!! :-)