Pages

Thursday, February 23, 2012

झाडपण

सकाळ-संध्याकाळ-रात्र
तेव्हा गात्रांमध्ये एकच गाणं असायचं...
तू नव्हतीस कधीच,
कारण येण्याआधीच तुझं नेहमी जाणं असायचं...

मागे उरायचे फक्त आभास...
सावल्यांवर स्वार होणार्‍या काही
काळोखी पोकळ्या...
आणि अंधारात लागणारे
उजेडाचे चकवे
आयुष्य असतेच गं असे फसवे...

दरवेळी उरामधलं ओझं हलकंच वाटत राहिलं
माझ्याच अनुभवांचं गाव माझ्यासाठीही परकंच राहिलं

तरी तू दरवेळी कधी ठामपणे
तर कधी संभ्रमाने सांगायचीस -
"तुझं झाडपण शाश्वत असेलही रे,
पण प्रेमासाठी सरणावर चढायची
माझीच तयारी झाली नाहीये अजून!"

मला तेव्हाच कळायला हवं होतं!
तुला तुझ्या ऐन बहरामध्ये
माझं झाडपण हवं होतं,
सावली हवी होती, झोके हवे होते...
पण हे एवढंच हवं होतं...
माझी त्यापुढेही शेवटपर्यंत साथ
नकोच होती तुला!
एकदातरी ऐकलं असतं तुझं तर?
मीही असा उन्हात वाळून गेलो नसतो
आणि तुलाही दरवेळी समाधान मिळालं असतं - प्रेम केल्याचं!

- नचिकेत जोशी (१७/२/२०१२)

3 comments:

Bharat Mahajan said...

Kavi Maharaj, Kaay prembhangachya kavita?

नचिकेत जोशी said...

:D :D

asa nahie kahi!

प्रशांत दा.रेडकर said...

खुपच छान लिहिले आहे
माझ्या साईटचा पत्ता:
१)संपुर्ण मराठी फेसबुक http://www.marathifanbook.com
२)http://www.prashantredkarsobat.in