Pages

Thursday, July 12, 2012

... चुकून झाले!

अनेकदा जे जगून झाले!
फक्त एकदा लिहून झाले

मला म्हणे ती - विसर मला तू!
बरेच मग आठवून झाले

करून झाल्यानंतर सुचले -
जे झाले ते चुकून झाले!

कागद भिजले, कागद सुकले
जगणे जेव्हा टिपून झाले!

कसे सारखे रडावयाचे?
बदल म्हणुन मग हसून झाले

पसार्‍यातुनी कविता उरली
जेव्हा मन आवरून झाले

- नचिकेत जोशी (२७/५/२०१२)

4 comments:

'तिच्या'साठी said...

सुंदर.....

प्रियांका विकास उज्वला फडणीस said...

मला म्हणे ती विसर तू मला
बरेच मग आठवून झाले

कागद भिजले कागद सुकले
जगणे जेंव्हा टिपुन झाले
>>

वा! वा!

पसार्‍यातुनी कविता उरली
जेंव्हा मन आवरून झाले
>> यासाठी मी निशब्द!
अप्रतिम

swarup said...

फारच सुंदर !!!

AJ said...

_/\_ take a bow dear friend !