Pages

Friday, October 19, 2012

समाधान व्हावे!

असे वाटते फार नादान व्हावे
जरासे तुझ्याहून बेभान व्हावे

पुरे लेखणीसारखे टोचणे हे!
कधी सोसणारे मुके पान व्हावे

नका वय विचारू, नका जात पाहू
अशाने कधी प्रेम सज्ञान व्हावे?

नको एकही शब्द बोलूस तूही
मनाचे मनाशीच संधान व्हावे

कधी दाटली खिन्नता जर मनावर
तुझ्या आठवांचेच थैमान व्हावे

जगावे असे अन् मरावे असे की -
कुणा ना कुणाचे समाधान व्हावे!

--- नचिकेत जोशी (१९/१०/२०१२)

3 comments:

Mayuri said...

lai bhari

प्रियांका विकास उज्वला फडणीस said...

दुसरा, तिसरा आणि सहावा शेर अ प्र ति म!

Hatts off!

कल्पेश पाटील said...

जगावे असे अन मरावे असे की
कुणा ना कुणाचे समाधान व्हावे..

अतिशय खासच